बुधवार, २७ मे, २०२०

फक्त तुझ्या साठी.

              -=| फक्त तुझ्यासाठी |=-

कळते दुरावे
न संवाद होते.
कळूनी कळेना
हे कळने सरते.
दिसते नयनी
नयन तुझ्याशी
बोलते.
दूर तू तरी
हा संवाद घडते.
स्पर्ष हवा असता
स्पर्ष दूरून छेडते.
संवाद तुझा माझा
मन तुझ्यात विरते,
मन तुझ्यात विरते...
.....राजेंद्र पिंपळकर